
बेंगळूर : राज्य सरकारने आठवडय़ात दुसऱयांदा जिल्हा पालकमंत्र्यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यानुसार बिदर, यादगीर आणि कोलार या तीन जिल्हय़ांसाठी पालकमंत्र्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. वन, कन्नड आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री अरविंद लिंबावळी यांना कोलार जिल्हा पालकमंत्रिपदी नेमण्यात आले आहे. तर पशूसंगोपनमंत्री प्रभू चौहान यांच्यावर बिदर जिल्हय़ाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर बागायत आणि रेशीम खात्याचे मंत्री आर. शंकर यांना यादगीर जिल्हा पालकमंत्रिपदी नेमण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी बेळगाव, बागलकोटसह सहा जिल्हय़ांसाठी पालकमंत्र्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या.









