दिल्ली सरकारने घरगुती उपयोगाची वीज जवळपास विनामुल्य देण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वीच घेतला आहे. त्यानुसार दिल्लीतील लक्षावधी घरांना 200 युनिट पर्यंतची वीज विनामुल्य दिली जात आहे. या विजेचा उपयोग केवळ घरात प्रकाश निर्माण करण्यासाठी व्हावा हा उद्देश आहे. तथापि अनेक ई रिक्षा चालक या विजेचा उपयोग रिक्षाची बॅटरी चार्ज करून फायदा कमवत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे दिल्ली सरकारला कोटय़वधी रुपयांचा चुना लागत आहे.
रिक्षा चार्ज करण्यासाठी जी वीज दिली जाते. तिची किमत 8.50 रुपये प्रति युनिट अशी आहे. तर 200 युनिट पेक्षा अधिक विजेचा वापर झाल्यास घरांसाठी 6.15 पैसे प्रति युनिट असा दर आहे. अनेक ई रिक्षा चालक या स्वस्त विजेचा उपयोग बॅटरी चार्ज करण्यासाठी करतात आणि प्रति युनिट जवळपास 9.15 रुपयांचा नफा स्वतः मिळवितात, असे दिसून आले आहे. यामुळे दिल्ली सरकारचे महिन्याला जवळपास 17.50 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. सरकारने आता अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे ठरविले आहे.









