बेंगळूर /प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. दरम्यान कर्नाटक हाय कोर्टाने केंद्र सरकारला ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपण आश्चर्यचकित झाल्याचे म्हंटले आहे.
सिद्धरामय्या यांनी “पंतप्रधान मोदी कर्नाटकच्या गरजेकडे दुर्लक्ष करतात का?” राज्यातील खासदारांवर टीका करताना त्यांनी नमूद केले की, “कर्नाटकने भाजपाच्या २५ खासदारांना लोकसभेवर पाठविले आहे. ते कोठे लपले आहेत? मोदींच्या विरोधात उभे राहण्याचे त्यांच्यात धाडस नाही का? ते कर्नाटकचे प्रतिनिधित्व करण्यास अयोग्य आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकला १२०० मे.टन द्रव ऑक्सिजन वाटप करण्याच्या कर्नाटक हायकोर्टाच्या निर्देशाविरोधात भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रीय सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे ते आश्चर्यचकित झाल्याचे कॉंग्रेसचे विधानसभेचे नेते सिद्धरामय्या यांनी सांगितले.
मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि भाजपचे कर्नाटक नेतृत्व केंद्राच्या निर्णयाच्या विरोधात कधी संघर्ष करणार का? कर्नाटकला १६००-१७०० मेट्रिक टन जास्त ऑक्सिजनची आवश्यकता आहे. परंतु केंद्र सरकारने मागणीच्या ६० टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजनचे फक्त ६७५ मेट्रीक टन वाटप केले आहे.”









