भिलवडी / वार्ताहर
भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोनाच्या पहिल्या व दुसरया लसीकरणासाठी आलेल्या जेष्ठ नागरीकांची मोठी गर्दी होती. पहाटे चार वाजल्या पासून जेष्ठ नागरीकांनी लसीकरणासाठी नंबर लावला होता. परंतु, आपत्ती व्यवस्थापनाने पहाटे पासून आलेल्यांची नंबराप्रमाणे यादी तयार केली होती. परंतु, ही यादी आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे दोन वेळा फाडण्यात आली. २८ एप्रिल पासून लसीचा तुटवडा आसून ४५ वयोगटातील लसीकरण अद्याप पुर्ण नाही.
दरम्यान, पहीला डोस घेतलेल्यांची पंधरा दिवस झाले तरी दुसऱ्या डोसचा पत्ता नाही.केवळ १४६ च डोस आले असल्याने दोनशेहून आधिक नागरीकांनी गर्दी केली होती. पहाटे पासून ताटकळत बसलेले जेष्ठ नागरिक आरोग्य विभागाच्या नियोजन शुन्य कारभारावर नारजी व्यक्त करीत घरी निघून गेले. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टीटंचा पुरता फज्जा उडाला होता. यावेळी नागरीकांच्यात नंबर लावण्यावरून प्रारंभी चौकटीतच हाणामारी झाली. तर आरोग्य कर्मचारी वर्गाकडून जेष्ठ नागरीकांना धक्काबुक्की करण्यात आली.
यावेळी डॉक्टरांनी जेष्ठ नागरिकांना धुडकाऊन लावले. तर पोलिस आधिकारयां कडून जेष्ठ नागरीकांना अर्वाच्च भाषा वापरल्याने जेष्ठ नागरिकांतून नाराजीचा सूर घटना ठिकाणी उमटत होता.