1 हजार 188 चाचण्यांमधील 596 बाधित
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोनापासून बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढताना दिसून येत आह़े मंगळवारी जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून करण्यात आलेल्या 1 हजार 188 कोरोचा चाचण्यांपैकी तब्बल 596 कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे जिह्यात एका दिवसात करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमधील 50 टक्क्यांहून अधिक कोरानाबाधित असल्याचे आढळून आल़े
कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाकडून ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेण्यात आली आह़े आता जिह्यामध्ये या मोहिमेला 20 दिवस उलटूनही कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसून आलेली नाह़ी त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आह़े जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 277 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 319 अशा एकूण 596 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आल़ी यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 84, दापोली 45, खेड 68, गुहागर 48, चिपळूण 246, संगमेश्वर 38, मंडणगड 16, लांजा 26 व राजापूर 25 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता 24 हजार 222 इतकी झाली आह़े
तर जिह्यामध्ये नव्याने 17 मृत्यूंची नोंद करण्यात आल़ी यामध्ये मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 3, संगमेश्वर तालुक्यातील 7, राजापूर 2, दापोली येथील 5 रूग्णांचा समावेश आहे. जिह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार, रत्नागिरी 185, खेड 84 गुहागर 29, दापोली 68, चिपळूण 137, संगमेश्वर 109, लांजा 42, राजापूर 54, मंडणगड 7 अशी नोंद आहे. जिह्यातील एकूण मृतांची संख्या 715 इतकी पोहोचली असून मृत्यूदर 2.95 इतका आह़े









