ऑनलाईन पेमेंटमुळे बर्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने पैसे देताना काही अडचणी येतात. बरेचदा पैसे कापले जातात पण पेमेंट झालेलं नसतं. म्हणूनच ऑनलाईन पेमेंट करताना विशेष काळजी घ्यायला हवी.
- ऑनलाईन माध्यमातून मोबाईल रिचार्ज केल्यानंतरही रिचार्ज झालं नसेल तर पेमेंट डिटेल्सचा स्क्रीन शॉट घेऊन ठेवा. पैसे कापल्यानंतरही रिचार्ज झालं नसेल तर कस्टमर केअरशी संपर्क साधा.
- सायबर कॅफे किंवा ऑफिसमधल्या कॉम्प्युटरवरून पेमेंट करण्याची वेळ आली तर सावध रहा. तुमच्या नेटबँकिंगचा पासवर्ड सेव्ह करू नका. ‘सेव्ह पासवर्ड’ हा पर्याय डिसेबल करा.
- ऑनलाईन खरेदी केल्यानंतर पैसे भरले असतील तर तो मेसेजही सेव्ह करून ठेवा. ई कॉमर्स साईटवर वस्तू कधीपर्यंत मिळणार तसंच आगाऊ पैसे भरल्याची माहिती नमूद केलेली असते. ही माहिती नीट जपून ठेवा. यामुळे होणारा गोंधळ टळू शकेल.









