कोलकाता \ ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मिळवलेल्या विजयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्याचा दर्जा देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे सरकारच्या अनेक योजना आणि सोयी सुविधांचा पत्रकारांना लाभ घेता येणार आहे.
मी सर्व पत्रकारांना कोविड योद्धा असं घोषित करते.” असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माध्यमांसमोर जाहीर केलं आहे. याशिवाय आज मध्य प्रदेश सरकारने देखील सर्व मान्यताप्राप्त पत्रकरांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देखील काल श्रमिक पत्रकारांना फ्रंटलाईन कोविड वॉरियर्स म्हणून घोषित केलं आहे.
प्रत्येकाने राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावी आणि कोणत्याही हिंसक घटनेत सहभागी होऊ नये. आपल्याला माहिती आहे की भाजप आणि केंद्रीय यंत्रणेने आपल्यावर खूप अत्याचार केले आहेत. मात्र, आपल्याला शांतता ठेवायची आहे. सध्या आपण कोरोनाची लढाई लढत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.