ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यातील सर्व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून घोषित केले आहे.
ओडिशा, बिहार, मध्यप्रदेशनंतर पश्चिम बंगालने पत्रकारांना कोरोना योद्धे म्हणून घोषित केले. तत्पूर्वी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त पत्रकारांचा आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत समावेश केला आहे. ते म्हणाले की, कोरोना काळात पत्रकार जीव धोक्यात ठेवून आपली कर्तव्ये पार पाडत आहेत. जनतेला वास्तव सांगणारे पत्रकार देखील प्रत्यक्षात कोरोना योद्धे आहेत. आघाडीच्या कर्मचाऱ्यांना प्रदान केलेल्या सर्व सुविधांचा लाभ अधिमान्य पत्रकारांनादेखील दिला जाईल.









