मुंबई \ ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालमध्ये कल हाती आले आहेत. त्यानुसार बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. बंगालमध्ये भाजपने कष्ट घेतले आहे. त्यांच्या कष्टचं कौतुक तर आहे. पण ममता बॅनर्जी यांना हरवणं तितकं सोपं नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रितिक्रिया दिली आहे. तसेच बंगालमध्ये पुन्हा दीदीच येतील असा विश्वास देखील त्यांच्याकडून यावेळी व्यक्त करण्यात आला.
संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, पुद्दूचेरी आणि तामिळनाडू सोडून कुठेच सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये दीदीच येणार आहेत. ममता बॅनर्जींना हरवणं तितकसं सोपं नाही. त्यांनी भाजपचं आव्हान स्विकारलं. आव्हान स्विकारण्याची धमक त्यांनी दाखवली. त्याचं कौतुक केलंच पाहिजे. एवढंच नाही तर त्या दोन जागांवर लढल्या नाही. त्या एकाच जागेवर उभ्या राहिल्या. त्यांनी आव्हान स्वीकारलं. बंगालमध्ये पुन्हा दीदीच येतील याचा आम्हाला विश्वास आहे, असं देखील ते म्हणाले.
तामिळनाडू आणि पुद्दुचेरी सोडून कुठेही सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची सत्ता येईल. केरळमध्ये सत्ता बदल होताना दिसत नाही. दुपारपर्यंत निवडणुकीचा माहौल कमी होईल. बंगालमध्ये भाजपचा आकडा वाढत आहे. त्यांची मेहनत आहे. गुंतवणूकही आहे. या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री बंगालमध्ये ठाण मांडून होते, असं ते यावेळी म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








