कोरोनाच्या नव्या उद्रेकामुळे देशभर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. लस उपलब्ध असली तरी ती सर्वांना पुरेल इतक्या मोठय़ा प्रमाणावर उत्पादित झालेली नाही. त्यामुळे आरोग्यविषयी नियमांचे पालन कसोशीने करणे हा सर्वसामान्य लोकांच्या हातातील सर्वात प्रभावी आणि किफायतशीर उपाय आहे.
प्रत्येकांनी मास्कचा उपयोग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि अनेक लोक योग्यप्रकारचा मास्क खरेदी करत नाहीत. तसेच नाक आणि तोंड पूर्णतः झाकले जाईल, अशा प्रकारे तो लावत नाहीत. यामुळे मास्कचा गळय़ात अडकवूनही त्याचा उपयोग कोरोना नियंत्रणासाठी होत नाही, असे दिसून येते. दर्जाहीन मास्क चुकीच्या पद्धतीने घालणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. ही बेजबाबदारपणाचे हा वेगळय़ा चर्चेचा विषय आहे. तथापि या संदर्भात अनेक डॉक्टरांनी महत्त्वाचा सल्ला दिला असून त्यानुसार एकाऐवजी दोन मास्क उपयोगात आणल्यास कोरोनापासून संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे करता येते.
सध्या कोरोनावरच्या औषधांचीही प्रचंड टंचाई आहे. ऑक्सिजनची कमतरता देशभर जाणवत आहे. अशा परिस्थितीत आरोग्यविषयक साध्या नियमांचे पालन करणे हाच कोरोना होऊ न देण्याचा सर्वोत्तम उपाय असल्याने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दोन मास्कचा उपयोग प्रत्येकाने करावा, असे आवाहन आहे.








