मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे लसीचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे १ मे पासून राज्यात या वयोगटासाठी लसीकरण सुरू करता येणार नसल्याचं देखील सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी याच निर्णयावरून राज्य सरकारवर निशाणा साधाल आहे.
प्रविण दरेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, लसीकरण सुलभ करण्याची केंद्राचीही मानसिकता आहे आणि आमचीही आहे. पण नियोजनाचा भाग राज्य सरकारचा आहे. मुंबईत एक ते दीड लाख लसी उपलब्ध असताना ४० ते ५० केंद्र बंद होती. आता तरी यामध्ये राजकारण करू नका. केंद्र सरकारसोबत समन्वयातून लस उपलब्ध करून घेऊन जनतेचं लसीकरण निश्चित वेळेत व्हायला हवं. ते फार लांबणं जनतेच्या जीविताच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही.
निश्चित वेळेत लसीकरण झालं नाही, तर त्यादरम्यान ज्या संकटाला सामोरं जावं लागेल, तेही आपल्याला परवडणारं नाही. जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून घेणं. केंद्र सरकारशी वाद न करता समन्वय ठेवणं, खासगी पातळीवर जास्तीत जास्त लस उपलब्ध करून घेणं आणि १ मेपासूनच उत्तम लसीकरण करण्याची गरज आहे. कारण ६ महिने हा खूप मोठा कालावधी आहे. त्यामुळे युद्धपातळीवर लस उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आता आपण राजकारणाच्या पलीकडे लसीकरणाची मोहीम राबवायला हवी. विरोधी पक्ष देखील यासाठी सरकारसोबत आहे. एकीकडे मोफत लस जाहीर करायची, दुसरीकडे लस अपुरी आहे असं सांगायचं. मुंबई पालिकेचे आयुक्त म्हणाले की लस उपलब्ध झाली नाही तर लसीकरण केंद्र सुरू करणार नाही. पण जशी लस उपलब्ध होईल, तशी केंद्र सुरू झाली पाहिजेत. अमुक साठा आला, तरच केंद्र सुरू करू अशी भूमिका जनतेवर अन्याय करणारी ठरेल, अशा शब्दांत प्रविण दरेकरांनी टीका केली आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








