मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात लॉकडाऊन वाढवला पाहिजे अशी मागणी केली आहे. एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, लॉकडाऊन वाढला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. नाशिक जिल्ह्यात १९ एप्रिलला ६८०० असणारी रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसात ३६०० एवढ्यावर आली आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ थांबली असून कमी होण्यास सुरुवात झाली आहे. हे एकट्या नाशिक जिल्ह्याचं आहे. १५ आमदार तिथून निवडून येत असून तिथे ही परिस्थिती असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
लॉकडाऊन कोणालाही आवडत नसून माझाही आधीपासून विरोध आहे. पण आरोग्य सुविधा संपत आहेत. असाचा मारा सुरु राहिला तर खूप मोठा गोंधळ होईल. लॉकडाऊन करुन साखळी खंडित करणे आणि रुग्ण वाढणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने 1 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊन वाढणार की, नाही यासंबंधी निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत होण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








