मुलांच्या तस्करीचे रहस्यमय जग आणि बेपत्ता मुलांवर आधारित चित्रट ‘बॅकवॉटर्स’च्या पोस्टरच्या प्रदर्शनासह चर्चा सुरू झाली आहे. या इन्व्हेस्टिगेटिव्ह-थ्रिलरला एफटीआयआय ग्रॅज्युएट अभिनव ठाकूर यांचे दिग्दर्शन लाभले आहे. या चित्रपटाची निर्मिती सुनील जैन, अंकित चंदिरामानी आणि आशीष गायकर मिळून करत आहेत. हा चित्रपट प्रसिद्ध राहुल राजू बेपत्ता प्रकरणावर आधारित आहे. राहुल राजू वयाच्या केवळ 7 व्या वर्षी 2005 मध्ये बेपत्ता झाला होता.
मुलांच्या बेपत्ता होण्याच्या कथेवर तयार हा चित्रपट ‘गॉड्स ऑन कंट्री’ म्हणजेच केरळची स्थिती मांडतो. हा चित्रपट अनेक सत्यघटनांवर प्रकाश टाकणार आहे. अभिनेता सरताज खारी चित्रपटात सीबीआय अधिकाऱयाची भूमिका साकारणार आहे. तर नीता पारयानी शोधपत्रकाराच्या भूमिकेत असेल. चित्रपटाचे चित्रिकरण केरळच्या बॅकवॉटर्स अलाप्पुझा येथे करण्यात येणार आहे.









