सातारा / प्रतिनिधी :
रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्य शपथ दिन रायरेश्वर युवा प्रतिष्ठानच्यावतीने साधेपणाने साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 एप्रिल 1645 रोजी हिंदवी स्वराज्याची शपथ रायरेश्वर येथे बारा मावळातील कानोजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसाप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या मंडळींना घेऊन घेतली. तो 376 वा स्मृती दिवस रायरेश्वर युवा प्रतिष्ठानच्यावतीने साधेपणाने साजरा करण्यात आला.
कोरोनाचे निकष पाळून भोर तालुका उपकार्याध्यक्ष धनाजी पवार, उपाध्यक्ष सुनील माने, पुणे जिल्हाध्यक्ष राहुल कंक, संभाजी ब्रिगेड भोर तालुका अध्यक्षगणेश चऱ्हाटे, सातारा जिल्हा अध्यक्ष विलास गूढेकर, उपअध्यक्ष संतोष खोपडे,योगेश शेंडगे, प्रेम साने आदी सहभागी झाले होते.