बेंगळूर/प्रतिनिधी
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील काही भागात डगडाटी वादळासह पाऊस पडणार आहे. तसेच गडगडाटासह पाऊस आणि वाऱ्याचा वेग ३०-४० किमी प्रतितास असणार आहे. दरम्यान दक्षिण कर्नाटक, उडुपी, कोडगू, चिक्कमंगळूरआणि शिवमोगा इथे पावसाची शक्यता आहे.
पुढील २४ तास बेंगळूर शहरासाठी स्थानिक हवामान अंदाजः ढगाळ आकाश. काही भागात पहाटेच्या वेळेस कदाचित खूप धुके असेल. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३३ आणि २२ अंश सेल्सिअस पर्यंत राहील.