बेंगरुळ / प्रतिनिधी
कर्नाटकात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 12 वी (PUC II) च्या प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा लेखी परीक्षेनंतर दोन दिवसांनी होणार आहेत. विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांच्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाने जाहीर केल्याप्रमाणे लेखी परीक्षा 24 मे ते 16 जून दरम्यान होणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी शिक्षण विभागाने 28 एप्रिल ते 18 मे दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. तसेच परीक्षेसंबंधी दिशानिर्देशही शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले होते. परंतु, राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता प्रात्यक्षिक परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









