ऑनलाईन टीम / बाली :
इंडोनेशियाची बेपत्ता पाणबुडी सरावादरम्यान बाली बेटांजवळ बुडाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ‘केआरआय नंग्गाला 402′ असे समुद्रात बुडालेल्या पाणबुडीचे नाव असून, पाणुबडीवरील चालक दलासह 53 सैनिकांना वीरमरण आले.
नौदलाचे चीफ ऑफ स्टाफ ऍडमिरल युदो मारगोनो यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, सरावादरम्यान बेपत्ता झालेल्या ‘केआरआय नंग्गाला 402′ पाणबुडीला जलसमाधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी या पाणबुडीशी संपर्क तुटला होता. पाणबुडीमध्ये फक्त 3 दिवस पुरेल इतकाच ऑक्सिजन बाकी होता. शनिवारी हा ऑक्सिजन संपला. जहाजांसह विमान आणि शेकडो नौसैनिक या पाणबुडीचा शोध घेत होते. मात्र, पाणबुडीचा शोध न लागल्याने पाणबुडी बुडाल्याचे नौदलाने अधिकृत जाहीर केले.