जिल्हा नियोजन भवनाच्या गेटवरच काळे कपडे परिधान करून पालकमंत्र्यांचा केला निषेध
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. आणि दुसरीकडे ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि बेडमुळे नागरिकांचे मृत्यू होत आहेत. मात्र पालकमंत्री यांचे सोलापूरकडे दुर्लक्ष होत आहे. पालकमंत्र्यांनी सोलापूरकरांना मामा बनविले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा अशी मागणी करत नगरसेवक सुरेश पाटील यांनी पालकमंत्री बदला अशी मागणी करत रविवारी निषेध आंदोलन केले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती असताना आचारसंहितेचे कारण सांगत सोलापूरकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सोलापूरची परिस्थिती गंभीर झाली आहे.सोलापूरमध्ये तातडीने ऑक्सिजन ,रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करावा आणि सोलापूरची परिस्थिती पूर्वपदावर आणावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली.
नियोजन भवन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असताना बाहेर भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी काळा कुर्ता आणि काळी गांधी टीपी घालून निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली पालकमंत्रीचा धिक्कार असो, उजणीचे पाणी इंदापूरला घेऊन जाणाऱ्या पालकमत्र्याचा धिक्कार असो, काढून टाका ,काढून टाका पालकमंत्री काढून टाका, अशा घोषणा देत असताना नगरसेवक देणाऱ्या सुरेश पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पालकमंत्री बदला
सोलापूरला आजपर्यंत कोरोना महामारी काळात दोन पालकमंत्री होऊन गेले. दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड यानंतर दत्तात्रय भरणे. दत्ताभरणे यांनी ऐन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोलापूरकडे दुर्लक्ष केले. आणि सोलापूरचे हक्काचे उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरकडे वळविले. अशा बिनकामच्या पालकमंत्र्यांना काढून टाका अशीही मागणी केली.