पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा आदेश
प्रतिनिधी/करमाळा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याला जोडणारे 173 लहान व मोठे रस्ते बंद केले जाणार आहेत. यामध्ये करमाळा तालुक्यातील ३८ मार्गांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
महाराष्ट्र पोलिस कायदा 1959च्या कलम 33 नुसार काल, शनिवार (दि.24) मध्यरात्रीपासून १ मे पर्यंत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील आंतरजिल्हा व आंतरराज्य रस्ते बंद केले आहेत. जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेले 173 लहान मोठे रस्ते नागरिकांच्या जाण्या-येण्यासाठी व वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्यात करमाळ्यातील ३८ ठिकाणचे रस्ते आहेत. हे आपत्कालीन प्रसंगी व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा, सरकारने परवानगी दिलेले सर्व सेवा व सुविधा पुरविणाऱ्या आस्थापनाच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून वापरता येणार आहेत, असे सातपुते यांनी आदेशात म्हटले आहे. १ मेपर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे.
करमाळा तालुक्यातील बंद केले हे रस्ते
कावळवाडी- बाभुळगाव, कावळवाडी- शिंपोरा, कावळवाडी- मानेवाडी, कावळवाडी- करपडी, रामवाडी- रेल्वेगेट ब्रिज- खानोटा, रामवाडी- बाभुळगाव, घरतवाडी- करपडी, कुंभारगाव- राशीन, सावडी- भराटे वस्ती- चिलवडी, सावडी- गाडे वस्ती- चिलवडी, गोरेवाडी- डोंबाळवाडी, कोर्टी- आळसुंदे, कोर्टी- गोरेवाडी- चिलवडी, हुलगेवाडी- डोबाळवाडी- कर्जत, लिंबेवाडी- फुंदेवाडी- शेगुड, रावगाव- डुकरेवाडी- शेगुड, वंजारवाडी- म्हाळंगी, वंजारवाडी ते डोंबाळवाडी, मोरवड ते डोंबाळवाडी, मोरवड ते महाळंगी, पुनवर- मसदपूर- लोणी, खडकी- दिघे, तरटगाव- कोकरवाडी, तरटगाव- जवळा, पाडळी- धोत्री- जवळा, पाडळी- जवळा- जामखेड, घारगाव- धोत्री, घारगाव- कोकरवाडी, वाघाचीवाडी- आलेश्वर, करंजे- आलेश्वर, भालेवाडी- बंगळवाडी’ बोरगाव- पाचवड, दिलमेश्वर- आलेश्वर, मिरगव्हाण- बंगळवाडी, नेरले- भोत्रे, आवटी- डोमगाव, आवटी- रोसा, सावडी- चिलवडी हे रस्ते बंद केले जाणार आहेत, अशी माहिती सोलापूर पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी आदेशाद्वारे दिले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









