ऑनलाईन टीम / सातारा :
कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्याने साताऱ्यात दुसऱ्यांदा लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील 447 केंद्रांवर लसीकरण केले जाते. मात्र, लसींच्या तुटवड्यांमुळे सर्वच ठिकाणी आज लसीकरण बंद ठेवण्यात आले.
सकाळी लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, थोड्याच वेळात सर्वच लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नाही, तसेच लस केव्हा उपलब्ध होईल हे सांगू शकत नाही, अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हातीच घरी परतावे लागले.
दरम्यान, जिल्ह्यात आतार्पंत 4 लाख 62 हजार नागरिकांना पहिला डोस तर 63 हजार 132 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. साताऱ्यात एकूण 5 लाख 25 हजार 363 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.