बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. यापार्श्वभूमीवर जद (एस) नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी भाजप नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारला बेंगळूरमधील कोविड -१९ पीडितांचे अंतिम संस्कार करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
कोविड १९ कारणामुळे मृत्यू झालेल्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी योग्य ती व्यवस्था न केल्याबद्दल सरकारची निंदा करीत माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीबेंगळूरच्या च्या आठही दिशानिर्देशांमध्ये तात्पुरती स्मशानभूमी उघडता येईल, अशी सूचना केली.
दरम्यान कुमारस्वामी यांनी, ‘योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे मृत्यू झालेल्या कोरोना रूग्णांच्या शेवटच्या संस्कारांची योग्य ती व्यवस्था करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे म्हंटले आहे.
तसेच कोविड संक्रमित व्यक्तींना योग्य वैद्यकीय सुविधा पुरविण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या सरकारने अंतिम संस्कार करण्यासाठी योग्य जागेची व्यवस्था करण्यास विलंब लावू नये. अन्यथा, लोक सरकारला शाप देतील यात शंका नाही. कोविड संक्रमित व्यक्तींच्या नातलगांना होणारा त्रास पाहून खरोखर हृदय ओसरले आहे. ” असे ते म्हणाले.