685 नवे रुग्ण, 11 मृत्यू, रत्नागिरी, संगमेश्वर, दापोलीत दीडशेच्या पुढे रुग्ण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये सोमवारी रूग्णसंख्या निम्म्यावर आल्याचा दिलासा अल्पकाळाचाच ठरला असून मंगळवारी तब्बल 685 नव्या रूग्णांची विक्रमी वाढ दिसून आल़ी मागील 24 तासांमध्ये 11 कोरोना मृत्यूची नोंद झाली असून रूग्णवाढीचा व मृत्यूचा वेग असाच राहिल्यास यंत्रणेसमोरील आव्हान अधीक गडद होणार आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालायकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील 24 तासात एकूण 2 हजार 97 चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 424 तर ऍन्टीजेन चाचणीत 261 असे एकूण 685 रूग्णांची नोंद झाल़ी यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 152 दापोली 162, खेड 55, गुहागर 34, चिपळूण 95, संगमेश्वर 166, मंगणगड 8, लांजा 11 व राजापूर 2 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील कोरोनाच् रूग्णांची एकूण संख्या आता 16 हजार 574 झाली आह़े
मागील 24 तासात 11 कोराना रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 67 वर्षीय महिला व 53 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा संगमेश्वर मधील 55 व 54 वर्षीय महिला, 64 वर्षीय पुरूष, चिपळूण येथील 63, 50 व 65 वर्षीय 3 पुरूष, राजापूरात 51, 75 व 86 वर्षीय पुरूषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े जिह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 475 झाली असून मृत्यूदर 2.86 इतका आह़े जिह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.61 आहे.