क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
केएससीए व धारवाड विभागिय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केएससीए धारवाड सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी विजया क्रिकेट अकादमीने क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक ब संघाचा 251 धावानी तर निना स्पोर्ट्स क्लब संघाने इंडियन बॉईज संघाचा 6 गडय़ाने पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. अमय भातकांडेने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत आक्रमक शतक झळकावले व 35 धावात 4 गडीही बाद केले. रविचंद्र उकलीने शतक झळकवले व विनित पाटीलने आकर्षक फलंदाजी करीत संघाला विजय मिळवून दिला.
युनियन जिमखाना मैदानावर इंडियन बॉईजने 30 षटकात सर्वबाद 151 धावा केल्या. आयुबने 5 चौकारासह 32, सर्फराज मुरगोडने 4 चौकारासह 26, रारिफ बाळेकुंद्री व वरून दड्डी यांनी 2 चौकारासह प्रत्येकी 16, अफाज पठाणने फ चौकारासह 18 धावा केल्या. नीना स्पोर्ट्स तर्फे मोहित सराफने 2 धावात 3, प्रथमेश लोहारने 19 धावात 2, अंगदराज हित्तलमनीने 36 धावात 2 तर संतोष सुळगे पाटील व गणेश जांभळे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल निना स्पोर्ट्स संघाने 23 षटकात 4 गडी बाद 153 धावा करून सामना जिंकला. विनित पाटीलने 7 चौकारासह नाबाद 65 धावांसह शानदार अर्धशतक झळकविले. दर्शन पाटीलने 2 षटकार 4 चौकारासह 39 तर गणेश जांबळे व नरेंद्र मांगोरे यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. इंडियन बॉईजतर्फे आरिफ बाळेकुंद्रीने 44 धावात 3 तर विश्वनाथ यल्लीगारने 1 गडी बाद केला.
केएससीए ऑटोनगर मैदानावर विजया क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 388 धावा केल्या. सलामीवीर रवीचंद्र उकलीने 2 षटकार 14 चौकारासह 87 चेंडूत 123 धावा तर अमेय भातकांडेने 5 षटकार 12 चौकारासह 68 चेंडूत 113 धावा करून स्पर्धेतील तिसरे व चौथे शतक झळकवले. संदेश पुरीने 5 चौकारासह 39, सिद्धार्थ गोधवानीने 2 चौकारासह 31, सुशांत पाटीलने 26 तर निलेश पाटीलने 4 चौकारासह 18 धावा केल्या. सीसीके ब धारवाडतर्फे रोहित ढवळेने 48 धावात 4 रोशन निंगासानी व पार्थ पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक धारवाड ब संघाचा डाव 34 षटकात सर्वबाद 137 धावात आटोपला. राहुल मानेने 3 चौकारासह 34, पार्थ पाटीलने 3 चौकारासह 19 धावा केल्या. विजया क्रिकेट अकादमीतर्फे अमेय भातकांडेने 35 धावात 4, चिराग गोधवानीने 13 धावात 2, शिवम गावडाने 14 धावात 2, यश हावळ्ळाण्णाचे व निलेश पाटील यांनी प्रत्येकी 1 गडीं बाद केला.









