३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत ; ७ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा
उंब्रज / प्रतिनिधी
पाल ता.कराड येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर उंब्रज पोलीसांनी छापा टाकून रोख रकमेसह असा मिळून सुमारे ३ लाख ५० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून ७ जणांवर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही सोमवार दि.१९ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. अंकुश अंतु जाधव (वय४७), संदीप सुरेश कणसे वय३६, रघुनाथ कुंडलिक पवार वय ४५ संदीप बाळासो काळभोर वय३९, तुषार शंकर तोंडावले वय ३०, शिवाजी हणमंत शिंदे वय४४,दिपक बाळासो काळभोर वय३७, सर्व रा.पाल ता.कराड अशी जुगार प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची तक्रार उंब्रज पोलीस ठाणे नेमणूक पोलिस कॉन्स्टेबल निलेश अशोक पवार यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.









