ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आज आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1112.15 अंकांनी घसरून 47721.88 वर कार्यरत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 310.40 अंकांनी घसरून 14307.60 अंकांवर वाटचाल करत आहे.
FPI ने भारतीय बाजारातून 4615 कोटी रुपये काढले
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) 1 तेे 16 एप्रिलदरम्यान भारतीय बाजारातून 4615 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामधील 28 कोटी रुपये त्यांनी बॉण्ड आणि डिबेंचर्समध्ये गुंतवले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आर्थिक पुनरुज्जीवनावर परिणाम होण्याची भीती असलेले परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेतून माघार घेत आहेत. यापूर्वी मार्चमध्ये FPI ने भारतीय बाजारपेठेत 17,304 कोटी, फेब्रुवारीमध्ये 23,663 कोटी आणि जानेवारीत 14,649 कोटी रुपये ठेवले होते.









