वार्ताहर / उचगाव
उचगाव येथे खास गुढीपाडव्यानिमित्त उचगाव फुटबॉल क्लबच्यावतीने फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शनिवार दि. 11 रोजी स्पर्धांचे उद्घाटन ग्रा. पं. चे अध्यक्ष जावेद जमादार तसेच ग्रा. पं. सदस्य एल. डी. चौगुले, बाळकृष्ण तेरसे, भैरू सुळगेकर, मोनाप्पा पाटील, गजानन नाईक, उमेश बुवा, माजी ग्रा. पं. सदस्य मनोहर कदम, ग्रा. पं. सदस्या मथूरा तेरसे, रुपा गोंधळी, अमरीन बंकापूरे, अंजना जाधव, उमा शंकर देसाई, बंटी पावशे, मोहन देसाई आदी उपस्थित होते. शहीद राहूल सुळगेकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धांमध्ये धारवाड हुबळी बेळगाव ग्रामीण भागातील बेळगाव तालुक्मयातील चोवीस संघाने भाग घेतला होता. अंतिम सामना हा एच. एम. डी व तिरंगा यांच्यात खेळविण्यात आला. यावेळी एच. एम. डी या संघाने तिरंगा संघावरती दोन गोल करून विजय संपादन केले. अंतिम सामन्याचे उद्घाटन उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार, सदस्य बाळकृष्ण तेरसे, एल. डी. चौगुले तसेच उचगावचे उदयन्मुख फुटबॉलपटू आलिशा बोर्जेस उचगाव फुटबॉल क्लबचे सर्व मेंबर यांच्या हस्ते करण्यात आले.
उचगाव ग्रा. पं. चे अध्यक्ष जावेद जमादार शहीद, राहुल सुळगेकर यांच्या स्मरणात ठेवण्यात आलेले पहिले बक्षीस 22,222 तसेच दुसरे बक्षीस 11,111 ग्रा. पं. सदस्य बाळकृष्ण तेरसे त्यांनी ठेवले. दुसरे बक्षीस उपस्थित ग्रा. पं. सदस्य चौगुले, भैरू सुळगेकर, महेश देसाई तसेच विजेता स्पोर्ट्स यांच्यावतीने सर्व खेळाडूंना मेडल देण्यात आले. तसेच या फुटबॉल मॅचसाठी हनुमान स्पोर्ट्स यांच्याकडून आकर्षक अशी ट्रॉफी देण्यात आली होती. तसेच दुसऱया नंबरची ट्रॉफी तो शिफ तहसिलदार यांनी दिली होती.
बक्षीस समारंभाला चंद्रकांत कडोलकर, तोसिफ तहसिलदार तसेच पुंडलिक पावशे, माधवराव राणे, अशोक चौगुले, बाळकृष्ण तेरसे तसेच उचगाव फुटबॉल क्लबचे सर्व मेंबर पदाधिकारी उचगावचे नागरिक विविध संघांचे कार्यकर्ते व फुटबॉलपटू मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









