पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना संक्रमणामुळे आता मुर्शिदाबाद जिलहय़ातील जंगीपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. जंगीपूर मधील आरएसपी उमेदवार प्रदीप नंदी यांनी शुक्रवारी कोरोनामुळे अखेरचा श्वास घेतला आहे. तर विविध राजकीय पक्षांच्या एकूण 5 उमेदवारांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना संक्रमित झाल्यावर काही दिवसांपूर्वी नंदी यांना मुर्शिदाबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण होऊन यापूहर्वी एका उमेदवाराला जीव गमवावा लागल होता. मुर्शिदाबादच्याच समशेरगंज मतदासंघातील काँग्रेस उमेदवार रिजाउल हक यांचा गुरुवारी एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. कोरोना बाधित झाल्याने हक यांच्यावर कोलकाता येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
याचदरम्यान निवडणुकीदरम्यान कोविड नियमांचे पालन करण्याप्रकररणी निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. आयोगाने राज्यातील सर्व राजकीय पक्षांची बैठक घेत त्यांना कोरोना विषयक दिशानिर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे.









