ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन गुरुवारी योगी सरकारने तुर्तास तरी बोर्ड परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच 15 मे पर्यंत बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी दिली. त्यांनी सांगितले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी म्हणजेच बुधवारी दिनेश शर्मा यांनी सांगितले होते की, युपी बोर्डाच्या परिक्षांच्या तारीखांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले होते की कोरोना स्थितीचा आढावा वेळोवेळी घेतला जाईल. आमचे 19 अधिकारी जे बोर्ड परिक्षांशी संबंधित आहेत, त्यातील 17 अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, ही चिंताजनक बाब आहे.
हायस्कूल आणि इंटरमीडिएटची परीक्षा पहिल्यांदा 8 मे पासून सुरू होणार होती. तर 10 वीची परीक्षा 25 मे रोजी तर 12 वी ची परीक्षा 28 मे रोजी संपणार होती. पण आता बोर्ड कोरोना परिस्थितीचा आढावा घेवून नवीन टाईमटेबल जारी करणार आहे.