बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बुधवारी सांगितले की, राज्य सरकारने एसएसएलसी परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) सारखा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
‘येत्या काही दिवसांत आम्ही कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेऊ. आतापर्यंत आम्ही सीबीएसई सारखा कोणताही निर्णय घेतलेला नाही, ‘असे ते म्हणाले.
बुधवारी जाहीर झालेल्या सीबीएसईच्या निर्णयाप्रमाणेच बरीच बोर्डाची परीक्षा स्थगित किंवा रद्द केली जाईल अशी आशा असताना मंत्री एस. सुरेश कुमार यांनी हे विधान केले. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार कर्नाटक एसएसएलसीच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या परीक्षा २१ जूनपासून सुरू होणार आहेत.