प्रतिनिधी / दापोली
बुधवारी रात्री सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या भीतीने दापोलीकरांनी बुधवारी दिवसभर दापोली तुफान गर्दी केली होती. यामुळे खरंच मिनी लॉकडाऊन सुरू आहे की नाही ? असा प्रश्न सर्वांना पडला.
बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील होती. ही जयंती दापोली तालुक्यात विविध ठिकाणी केवळ पूजा करून अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कुठेही ढोल, ताशे, मिरवणूका पाहायला मिळाल्या नाहीत. लॉकडाउनच्या भीतीने अनेकांनी बुधवारी जीवनावश्यक वस्तुंचा साठा करून ठेवल्याचे चित्र दिसून येत होते. दापोली बसस्थानकासमोर असणाऱ्या काजू खरेदीदार दुकानांच्या समोर तर सकाळपासून काजूबिया विक्रीसाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या.