ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर केले आहे. मंगळवारी तब्बल 13 हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे राजधानीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील 24 तासात 13 हजार 468 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 81 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारी नुसार, मागील 24 तासात 7,972 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 7 लाख 50 हजार 156 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 6 लाख 95 हजार 210 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 11,436 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू दराचे प्रमाण 1.52 % इतके आहे. सद्य स्थितीत 43,510 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 57 लाख 53 हजार 100 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 64,544 आरटीपीसीआर टेस्ट आणि 37,916 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 13.14 % आहे. तर 6852 झोन आणि 1,178 कंट्रोल रूम आहे.









