लिगसीमध्ये झळकणार दोन्ही कलाकार
90 च्या दशकातली सुपरस्टार मस्त मस्त गर्ल रविना टंडन आणि अक्षय खन्ना पहिल्यांदाच दिग्दर्शक विजय गुट्टे यांची वेबसीरिज ‘लिगसी’मध्ये एकत्र दिसून येणार आहेत. पण दोघांच्या व्यक्तिरेखेत वेब सीरिजमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आणि संघर्ष पहायला मिळणार आहे.
संघर्षाची तीव्रता मोठय़ा प्रमाणात दर्शविण्यासाठी आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत सीरिज पोहोचण्यासाठी याचे चित्रिकरण अनेक देशांमध्ये पार पडले आहे. विजय गुट्टे यांनी यापूर्वी ‘द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘लिगसी’द्वारे ते डिजिटल जगतात पाऊल ठेवत आहेत. व्यावसायिक जगतातील कृष्णकृत्यांना समोर आणणारी ही सीरिज ठरणार आहे. आफ्टर स्टुडिओज, एए फिल्म्स आणि सनी बक्षी यांच्याकडून याची निर्मिती करण्यात येत आहे.









