नवी दिल्ली
भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरलेली असून याचा परिणाम देशाच्या आर्थिक सुधारणांवर होणार असल्याचे मूडीज इन्वेस्टर्स सर्व्हिसेसने म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2022 साठीच्या 13.8 टक्के विकासाच्या अंदाजावरही परिणाम होण्याची भीती मुडीजने व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात देशातील विविध राज्यांमध्ये होत असून लॉकडाऊन लावण्याच्या शक्यतेला बळ मिळताना दिसत आहे. याने येणाऱया काळात आर्थिक उलाढालीवर परिणाम होऊ शकतो. विविध व्यवसायांना याचा जबर फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मूडीजने म्हटले आहे. कोरोना रोखण्याचे प्रभावी उपाय व लसीकरणाचा वेग वाढवल्यास ते सोयीचे होणार आहे.









