श्री तांबळेश्वर हायस्कूल तांबाळे,व फातीमा राईस मिल लाखोचे नुकसान
पाटगांव / वार्ताहर
भुदरगड तालुक्यातील तांबाळे परिसरात मंगळवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने अनेकांच्या दुकानाचे व घराचे, शाळेचे पत्रे उडून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आठवडयात दुसऱ्यांदा वादळाचा तडाखा बसल्याने नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तांबाळे परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याचा तडाख्याने फातिमा राईस मिलवरील पत्रे उडून दोनशे मीटर अंतरावर पडले आहेत . त्यामुळे राईस मिल मधील कांडप पास साठी आलेले धान्य मांडून ठेवलेले तांदूळ कोंडा यांची सुमारे दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे तर तांबळेश्वर हायस्कुलचे पत्रे उडून संगणक कक्ष आणि व्हरांडा पाणी शाळेवरील छप्पर उडून गेल्याने सुमारे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले आहे युवराज मोहिते, हरीश देसाई ,रामचंद्र थवी, फर्नांडिस , मायकल डिसूजा, कारमेलीन हायस्कूल यांच्या घरावरील पत्रे आणि आजूबाजूची झाडे पडून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे आर्या कापड दुकानावरील छत उडुन शुटींग व शर्टींगचे पन्नास हजाराच नुकसान झाले आहे.
बशाचा मोळा येथील पाडूरंग पाटील याच्या घरावर फणसाचे झाड पडून दहा हजाराचे नुकसान झाले आहे . रामचंद्र पोतदार याच्या शेडवरील पत्रे उडून २५ हजाराचे नुकसान झाले आहे दोन दिवसामागे तांबाळे परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने घरे व दुकानाचे नुकसान झाले होते आज पुन्हा मोठ्या प्रमाणात वादळझाल्याने मठगांव, अतुर्ली, तांबाळे, बशाच्या मोळा या गावातील घरांचे लाखो रुपयांच नुकसान झाले, नैसर्गिक आपत्तीने सर्वसामान्य लोकांचे आर्थिक नुकसान झाल्याने शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकाकडून होत आहे वादळी वारे सुटल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. काही ठिकाणी गारपीटही झाली. जोराच्या वादळाने रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली आहेत तर पावसामुळे विद्युत खांब कोसळल्याने अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता.