सीपीआर दोन दिवसांनंतर कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटल, नव्वद नॉन कोरोना रूग्ण होणारजीवनदायी’ हॉस्पिटलकडे शिफ्ट,
सेवा रूग्णालयात नॉन कोरोना, ओपीडीसाठी हालचाली गतीमान
प्रतिनिधी / कोल्हापूर
केरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने सीपीआर हॉस्पिटल फक्त कोरोना'साठी घोषीत केले आहे. त्यातूनच उपचार सुरू असलेल्या 50 टक्के नॉन कोरोना रूग्णांना सोमवारपासून
जीवनदायी’शी निगडीत हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे. बुधवारपर्यत हॉस्पिटलमधील 90 रूग्ण स्थलांतरीत होणार आहेत. गुरूवारपासून सीपीआरमध्ये फक्त कोरोना रूग्णांवर उपचार होणार आहेत. त्यादृष्टीने पत्रव्यवहाराची प्रक्रियाही अंतीम टप्प्यात आहे.
छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सर्वोपचार रूग्णालय अर्थात सीपीआर हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आधारवड आहे. गतवर्षी कोरोना काळात 1 मार्चला हे हॉस्पिटल कोरोना रूग्णांसाठी आयसोलेटेड केले होते. त्यानंतर इचलकरंजीतील आयजीएम व गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय आयसोलेटेड केले होते. सीपीआरकडील नॉन कोरोना रूग्णांवर लाईन बाजार येथील सेवा रूग्णालयात उपचार होत होते. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये कोरोनाची साथ कमी झाली अन् सीपीआर 50 टक्के नॉन कोरोना रूग्णांसाठी खुले झाले. त्यामुळे सेवा रूग्णालयावरील भारही कमी झाला होता.
जानेवारीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले, त्याचा चौथा टप्पा सुरू आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली, अन् सद्यस्थितीत जिल्हÎात अडीच हजारांपर्यत सक्रीय रूग्ण आहेत. सप्ताहापुर्वी वाढती रूग्णसंख्या पाहून जिल्हाधिकाऱयांनी `सीपीआर कोरोना आयसोलेटेड’ची सुचना केली होती. त्यानंतर नव्याने शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. 650 बेडच्या या हॉस्पिटलमध्ये 50 टक्के बेड कोरोना रूग्णांसाठी राखीव होते, पण तेही फुल्ल झाले आहेत. टप्प्याटप्प्याने एकेक वॉर्ड कोरोना रूग्णांसाठी खुला केला जात आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत 450 ऑक्सिजन बेड आहेत. अपर, लोअर कोरोना, दुधगंगा, मानसोपचार वॉर्डमध्ये कोरोना रूग्ण आहेत. गेली 3 दिवस हे बेडही कमी पडू लागले आहेत. सोमवारी उपलब्ध बेडच्या माहितीसाठी यंत्रणा सज्ज केली आहे. नॉन कोरोना रूग्णांना हळूहळू जीवनदायी योजनेशी संलग्नित हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले जात आहे. मंगळवारी, बुधवारीही रूग्ण स्थलांतरीत प्रक्रिया सुरू राहणार आहे. सेवा रूग्णालयात नॉन कोरोना रूग्णांसाठी यंत्रणा उभारण्यात येत आहे. कोरोना ओपीडीला गर्दी वाढल्याने अपघात विभागातही संशयित रूग्णांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे गुरूवारपासून सीपीआर हॉस्पिटल फक्त कोरोना रूग्णांसाठी सुरू राहणार आहे.