प्रतिनिधी / बेळगाव
केएलएस आयएमईआरने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांसाठी सुलभ केली’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या जीवनात विद्यार्थी, कर्मचारी, आयटी आणि नॉन आयटी व्यावसायिकांना कृत्रिम बुद्धिमत्ता व त्यावरील अनुप्रयोगांचे अन्वेषण करण्याचा या सेमीनारचा मानस आहे. डॉ. अतुल आर. देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ए. आय. ने आपले जीवन कसे बदलेल आणि सर्व व्यावसायिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज यावर त्यांनी भर दिला. या कार्यशाळेत एलआयएम ऍण्ड डी. एस. एक्स्पर्ट जिग्यासा इन्फोनॉटिक्सच्या संस्थापिका व सीईओ चेतना सारंग यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचे विविध पैलू या विषयीची माहिती दिली. या कार्यशाळेत विद्यार्थी, शिक्षक, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी भाग घेतला. प्रा. दीपा सैबण्णावर यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले.









