ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहेत. मागील 24 तासात 1 लाख 68 हजार 912 रुग्णांची विक्रमी नोंद झाली. तर 904 रुग्णांचा मृत्यू झाला. बाधितांच्या आकडेवारीबरोबरच मृतांचा आकडाही सलग वाढत असून, मागील सहा महिन्यात एका दिवसात जीव गमावणाऱ्यांची संख्या रविवारी सर्वाधिक होती.
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 35 लाख 27 हजार 717 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 70 हजार 179 एवढी आहे. रविवारी 75,086 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 21 लाख 56 हजार 529 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 12 लाख 01 हजार 009 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 10 कोटी 45 लाख 28 हजार 565 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 25 कोटी 78 लाख 06 हजार 986 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 80 हजार 136 कोरोना चाचण्या रविवारी (दि.11) करण्यात आल्या.









