प्रतिनिधी / मिरज
मिरज मार्केट यार्डातील सेजल व्होकेशनल ट्रेंनिग इस्टिट्यूटमध्ये फॅशन डिझायनिंगचा कोर्स शिकविणारी शिक्षिका दीपाली बाळासाहेब कलगुटगी (वय २४ रा. वडर गल्ली) हिने इन्स्टिट्यूटच्या इमारतीतच पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.
मिरज दुय्यम बाजार आवार समितीमध्ये सेजल फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेत दीपाली कलघुटगी ही फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम शिकवीत होती. काही दिवस ती नैराश्येत होती. सदर संस्था ही दीपालीच्या घराजवळच आहे. त्यामुळे दीपाली ही रविवारी तेथे गेली होती. सायंकाळी उशीरापर्यंत ती घरी आली नसल्याने घरच्यांनी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन पाहिले असता तिने पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. मात्र, तिने कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली, हे स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती महात्मा गांधी पोलीसांना मिळाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस तपास करीत आहेत.









