मुंबई / ऑनलाईन टीम
मनसेप्रमुख राज ठाकरे यांना शनिवारी अचानक लीलावती रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कमरेजवळचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे राज यांच्यावर शनिवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. राज ठाकरे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. त्यामुळे आज, रविवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.
राज ठाकरे यांना शनिवारी अचानक लीलावती रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही राज ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र, आता ते रुग्णालयातून घरी येणार आहेत. यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याशी लॉकडाऊनसंदर्भात काही चर्चा करणार का, हे पाहावे लागणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








