खा. उदयनराजेंचे अनोखे आंदोलन नाक्यावर प्रशासनाच्या विरोधात केले भीक मागो आंदोलन
प्रतिनिधी / सातारा
लॉकडाऊनचे निर्बंध लादल्याच्या निषेधार्थ सातारचे खासदार उदयनराजे यांनी पोवई नाक्यावर आंब्याच्या झाडाखाली पोत टाकून त्यावर बसून भीक मागो आंदोलन केले. त्यात जमलेली 450 रुपयांची भीक घेऊन स्वतः त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत जाऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना नेऊन दिली. ही भीक घेण्यासाठी तहसीलदार पुढे आले. यावेळी मीडियाशी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, सातारचे जिल्हाधिकारी एक नंबरचे नालायक आहेत.
निर्बंध कशाला लावले आहेत. इकडे लोक उपाशी मरायला लागले आहेत. लॉकडाऊन उठवले नाहीतर लोक मारतील. नो लॉकडाऊन,जो काय निर्णय आहे तो सायटीन्स घेतील, असे त्यांनी ठणकावून सांगितले.