नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि फ्रान्सच्या राफेल विमानांच्या व्यवहारात दलाली आणि आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप फ्रान्सने फेटाळून लावला आहे. मागील आठवडय़ातच प्रेंच ऑनलाईन जर्नल ‘मीडियापार्ट’ने यासंबंधी आरोप केल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. राफेल व्यवहारामध्ये ‘दसॉल्ट’ने एका भारतीय मध्यस्थाला सुमारे 10 लाख युरो दिल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. तथापि, ‘दसॉल्ट’ने असा कोणताही घोटाळा झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारी अधिकारी, फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था यांनी संयुक्तपणे या कराराचा आढावा घेतला असून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा घोटाळा झाल्याचे सापडलेले नाही, असे ‘दसॉल्ट’कडून सांगण्यात आले.









