बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) चे व्यवस्थापकीय संचालक अजय सेठ यांची सरकारने बदली केली आहे. १९८७ च्या बॅचचे कर्नाटक-केडरचे आयएएस अधिकारी सेठ यांची मंगळवारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव (डीईए) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
जुलै २०१८ मध्ये महेंद्र जैन यांच्या जागी अजय सेठ यांची बीएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली गेली होती.