सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई
प्रतिनिधी / सांगली
इस्लामपूर येथील उत्पादन शुल्क निरीक्षक शहाजी आबा पाटील, वय ५६ वर्ष, यांना १५ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
तक्रारदार हे परमिटरूम बिअरबार चालक असून त्यांचे परमिटरूम बिअरबारचे लायसन्स रिन्यू करून देण्याकरीता उत्पादन शुल्क, अधिकारी पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे २० हजार रूपयाची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी उत्पादन शुल्क, इस्लामपूर कार्यलय या ठिकाणी सापळा लावला होता त्यामध्ये पाटील यांनी १५ हजार रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे, पोलीस अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संकपाळ, अजित पाटील, भास्कर भोरे, रविंद्र धुमाळ, राधिका माने, सिमा माने यांनी केली आहे.








