वार्ताहर / म्हैसाळ
गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून. वाढत्या संख्येमुळे शासकीय हॉस्पीटल ही भरू लागली आहेत. दरम्यान शासनाने काही खाजगी हॉस्पिटल्सना ही कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना पेशंटना तात्काळ बेड मिळण्यासाठी कॉल सेंटर सुरू केले असून सदरचा नंबर . 9123323749000 असा आहे. गरजू पेशंटनी या नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता नंदकुमार कोरे यांनी म्हैसाळ येथे बोलताना केले.
म्हैसाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कोरोणा लसीकरणाचे काम युध्दपातळीवर सूरु आहे. तसेच कोविड चाचणीची ही सोय केली आहे. जिल्ह्यातही सर्व आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी जिल्हापरिषदेची आरोग्य यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत आहे. शासनाने जाहीरकेल्या नुसार वय वर्षे 45 पुढील नागरीकांनी मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा. व आपण व आपले कुटुंब पर्यायाने आपले गाव कोविड पासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले आहे.








