ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाला
प्रतिनिधी / कोल्हापूर
गोकुळची ज्याच्याकडे सत्ता त्याचे ठराव अधिक असे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारी देऊन सामान्य कार्यकर्त्याचा बळी द्यायच काय हा प्रश्न आमच्यासमोर आहे. ताकदीने लढायचं असेल तर आपल्याच मोठÎा लोकांना उभं केलं पाहिजे अशी ठाम भूमिका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली. छाननीनंतर उमेदवारांची घोषणा करणार आहे. असे सांगितले. शुक्रवारी जिल्हा बँकेत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, गोकुळची सत्ता अनेक वर्षापासून आमच्याकडे नाही. गोकुळमध्ये जो सत्तेवर असतो, त्याच्या संस्था असतात, जादा ठराव असतात. अशा वेळी समान्य कार्यकर्त्याची ताकद पोहचत नाही. त्यांचा बळी द्यायचा नाही. खर्चाच्या वेळी सामान्य कार्यकर्ता आणि नंतर तुमची पोर उभी करता असे लोक म्हणतील हा शिक्का आम्हाला नको आहे. दूध उत्पादकाला दोन ते चार रुपये जादा देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. असे ठामपणे सांगितले. तर दूध विक्रीचा दर वाढवणार का या प्रश्नावर त्यांनी मुंबईत दरवाढ केली तर काय फरक पडणार आहे. असा सवाल केला. शेणमुतात हात घालणाऱया भगीनीला दोन रुपये जादा मिळावेत ही च अपेक्षा आहे. विरोधी आघाडीत गर्दी होत आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, चांगले लोक आहेत. ते आमच्याकडे आकर्षीत होणारच. चांगला कारभार करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
राजू शेट्टी यांच्या मागणीचे स्वागत
स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या भेटीसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक गेले होते. यावेळी शेट्टी यांनी न दमता दहा लिटर दूध काढणाऱयालाच गोकुळची उमेदवारी अशी अट घालण्याची मागणी केली होती, याव मुश्रीफ यांना बोलते केले असता त्यांनी या मागणीचे स्वागत करतो, असे सांगितले. त्याच बरोबर आमदार प्रकाश आवाडे यांच्या तिसऱया आघाडीलाही शुभेच्छा असल्याचे सांगितले









