नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी आयपीएल स्पर्धेसाठी इंग्लिश सलामीवीर जेसॉन रॉयचा सनरायजर्स हैदराबाद संघात समावेश केला गेला आहे. तो मिशेल मार्शची जागा घेईल. मिशेल मार्शने वैयक्तिक कारणास्तव आपण खेळू शकणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर हैदराबाद व्यवस्थापनाने जेसॉन रॉयची संघात वर्णी लावली. मार्श यापूर्वी 2020 च्या हंगामात पहिल्या लढतीतच दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतर त्या पूर्ण हंगामात तो खेळू शकला नव्हता. जेसॉन रॉयने 2017 मध्ये गुजरात लायन्सतर्फे आयपीएल पदार्पण केले असून 2018 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताचे दिल्ली कॅपिटल्स) संघाचे त्याने प्रतिनिधीत्व केले. त्याच्या खात्यावर 8 सामन्यात 179 धावा आहेत. जेसॉन रॉयला हैदराबादने त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.









