नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील प्रोजेक्ट ऍण्ड डेव्हलपर्स इंडिया लि. (पीडीआयएल) यांनी ंसरकारला 2019-20 साठीचा लाभांश स्वरुपातील जवळपास 9.55 कोटी रुपये दिले असून यासोबत 2020-21 साठी अंतरिम लाभांशाच्या रुपाने 6.93 कोटी रुपये दिले आहेत. अधिकच्या माहितीनुसार पीडीआयएलचे संचालक(वित्त) सुधाकर रमॅया यांनी ही रक्कम मंत्री डे.व्ही. सदानंदगौडा यांच्याकडे दिलेली आहे. पीडीआयएलला 2019-20 मध्ये प्रकल्पामधून 133.01 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. तर एकूण उत्पन्न 142.16 कोटी रुपये झाल्याची नोंद करण्यात आली आहे.









