बेंगळूर/प्रतिनिधी
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर त्यांनी एका महिन्यात २ हजरापेक्षा जास्त डॉक्टर आणि ७०० पॅरामेडिकल, नर्सिंग स्टाफ भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले.
विजयनगर वैद्यकीय विज्ञान संस्था (व्हीआयएमएस) येथे ग्रंथालय, व्याख्यान व परीक्षा सभागृह व इतर पायाभूत सुविधांच्या आभासी पायाभरणी समारंभात ते बोलत होते. यावेळी मंत्री सुधाकर यांनी ग्रामीण भागात सेवा देणार्या डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी काही कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले.
तसेच ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या पगारामध्ये वाढ करुन त्यांचा पदोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे ते म्हणाले.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या धर्तीवर व्हीआयएमएस विकसित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, असे सुधाकर म्हणाले. दरम्यान शेजारील आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील लोकही संस्थेत उपचारासाठी येतात, असे म्हणाले.