प्रतिनिधी/ बेळगाव
शिर्शीचे पोलीस उपअधीक्षक रवी डी. नाईक यांना मुख्यमंत्र्यांचे पदक जाहीर झाले आहे. पोलीस दलात रुजू होऊन केवळ तीन वर्षात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री पदकासाठी त्यांची निवड झाली आहे.
रवी नाईक हे मूळचे कारवार जिल्हय़ातील असून एमए, एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुरुवातीला तब्बल 20 वर्षे भारतीय हवाई दलात त्यांनी सेवा बजावली आहे. एअरफोर्समधून निवृत्त झाल्यानंतर पाच वर्षे बेळगाव येथे युनियन बँकमध्ये सेवेत होते.
त्यानंतर त्यांची पोलीस दलात नियुक्ती झाली. 46 वषीय रवी नाईक हे एक उत्तम पोलीस अधिकारी म्हणून परिचित आहेत. ऑक्टोबर 2017 मध्ये ते पोलीस दलात रुज झाले आहेत. येथील तिरुपती ट्रव्हल्सचे संचालक विनोद नाईक यांचे ते भावोजी आहेत.









