मुंबई / ऑनलाईन टीम
फोन टॅपिंग संदर्भातील अहवालावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आरोपाची मालिकाच सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंगचा अहवाल नवाब मलिक यांनी फोडला असल्याचा आरोप केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे, तेवढी कुठल्याही दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. मला माहिती आहे नवाब मलिक का चिंतेत आहेत?, कारण त्यांना हे माहिती आहे की, फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे. त्यामुळे अनेक लोकांचं बिंग फुटतं आहे. मी त्या दिवशी देखील सांगितलं की, महाराष्ट्र पोलिसांची बदनामाी करण्याचा जो काही प्रकार आहे. त्यामध्ये खरंतर हा रिपोर्ट नवाब मलिक यांनींच फोडला. मी पहिली दोन पानंच दिली होती. पण मी हा सवाल विचारू इच्छितो, की सिंडिकेट राज चालवल्याने, बदल्यांमध्ये पैसे खालल्याने, दलाली केल्याने आणि वाझे सारख्या लोकांना सेवेत घेऊन त्यांच्या माध्यमातून सिंडिकेट राज चालवल्याने महाराष्ट्र पोलीस बदनाम झाली की महाराष्ट्र पोलिसांचं नावं झालं? आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जे सगळे वाझेचे मालक आहेत, ते आज चिंतेत असल्याचे यावेळी फडणवीस म्हणाले.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले की, सचिन सावंतांना मी काय उत्तर द्यायचं. त्यांना काय समजतं तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. असं रोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार? यासोबतच पोलिसांच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर कुणीही गायब केली तरी त्याचा बॅकअप मेन सर्व्हरला आहे त्यामुले मुंबई पोलिसांच्या सीसीटीव्हीमधील फुटेज नष्ट करणे अशक्य असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








